कौतुकास्पद..! अभिनेता आर. माधवनच्या मुलाने केली अशी कामगिरी..जिंकलं रौप्य पदक

0

बॉलीवुड आणि टॉलीवुडमध्ये प्रसिद्ध असलेला अभिनेता आर माधवन नेहमीच चर्चेत येत असतो. सोशल मीडियावर तो सक्रिय असल्याने त्याच्या आयुष्यात काहीही घडले की प्रेक्षकांजवळ लगेचच पोहोचते. आता त्याच्या आयुष्यात एक सुखद क्षण आला आहे. जो त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेयर करून व्यक्त केला आहे. काय आहे ही आनंदाची बातमी जाणून घ्या…

आर माधवनचा मुलगा वेदांत एक उत्कृष्ट जलतरणपटू आहे.आपल्या या टॅलेंट ने तो नेहमी यश मिळवत असतो.  गेल्यावर्षी देखील त्याने बेंगळुरू येथे झालेल्या ४७ व्या ज्युनिअर नॅशनल अ‍ॅक्वाटिक चॅम्पियनमध्ये चार रौप्य पदकांसह तीन कांस्य पदके पटकावली होती.

गेल्यावर्षी मार्चमध्ये लॅटव्हियन ओपन स्विमिंग चॅम्पियन्स स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.आपल्या मुलाच्या अशा कामगिरीनं कुठल्याही बापाची छाती अभिमानाने फुलून येईल.

आर. माधवन हा सुद्धा याला अपवाद नाही. डेन्मार्क ओपनचा एक व्हिडीओ माधवनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यात त्याचा मुलगा वेदांत याला रौप्य पदक देऊन गौरिवण्यात येतंय. आम्हा सगळ्यांना तुझा सार्थ अभिमान आहे, असं हा व्हिडीओ शेअर करताना माधवनने लिहिलं आहे की, “तुमच्या सर्व आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने@swim_sajan आणि@वेदांत माधवनने कोपनहेगन येथील डॅनिश ओपनमध्ये भारतासाठी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले. प्रशिक्षक प्रदीप सर, SFI आणि ANSA यांचे खूप खूप आभार. आम्हाला खूप अभिमान आहे.”

View this post on Instagram

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

सोबतच या स्पर्धेमध्ये वेदांत १५०० मीटर फ्री स्टाईल प्रकारामध्ये सहभागी झाला होता. वेदांत माधवन यानं १५०० मीटर फ्री स्टाइल स्विमिंग प्रकारात रौप्य पदक कमावलं आहे. हे पदक त्यानं १५:५७:८६ अशी वेळ नोंदवत पटकावलं. आर. माधवननं त्याच्या ट्विटर हँडलवर स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियानं ट्वीट केलेला व्हिडिओ रीट्वीट करत ही माहिती दिली. त्याच्या या पोस्टनंतर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी त्याचं अभिनंदन केलं आहे. शिल्पा शेट्टी, ईशा देओल, नम्रता शिरोडकर, दर्शन कुमार आदिंनी वेदांतला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या वर्षी वेदांतच्या १६ व्या वाढदिवशी आर. माधवनने आपल्या लेकासाठी एक जबरदस्त पोस्ट शेअर केली होती. ‘ज्या गोष्टींमध्ये मी पुढे होतो, त्या सर्व गोष्टींमध्ये मला मागे टाकल्याबद्दल धन्यवाद. माझी छाती गर्वाने फुगते. मी दरवेळी तुझ्याकडून नवं काही शिकतो. तू चांगला माणूस बनशील, अशी मला आशा आहे. मी एक भाग्यशाली बाप आहे,’अशा भावना आर माधवनने व्यक्त केल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.