अभिनेत्री मुमताजना होतोय या जुन्या आजाराचा त्रास, इराणी असल्यामुळे होतोय हा त्रास..स्पष्ट केलं कारण

0

बॉलिवुडमधील सुवर्ण काळ म्हणजे ७०-८० चे दशक.. या दशकात बॉलीवुडला अनेक हरहुन्नरी कलाकार मिळाले. अभिनय, सुंदरता, शालीनता आणि दिलफेक अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीनी बॉलीवुडमध्ये आपली जागा कायम केली. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे मुमताज.. राजेश खन्ना आणि मुमताज यांची जोडी मोठ्या पडद्यावर आली की सिनेमागृह प्रेक्षकांनी खचाखच भरलेले असायचे.

मुमताजने आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे काम अगदी चोखपणे केले. नक्षीदार आणि पाणीदार डोळ्यांनी तिने मोठ्या पडद्यावर आपली जादू केली होती. जी आजवर कायम आहे. पण रुपेरी पडद्यावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीला नुकताच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. पण तिला काय झाले आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

६० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक हिट सिनेमे देणाऱ्या मुमताज यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुमताज यांनी हेल्थ अपडेट देत चाहत्यांशी संवाद साधला आहे. गेल्या आठवडाभरापासून त्या डायरिया आजारावर ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. आता त्यांना डिस्चार्ज मिळाला असून २५ वर्षापूर्वीच्या ब्रेस्ट कॅन्सरचे परिणाम आजही भोगत असल्याचं त्या म्हणाल्या. त्यात इराणी असल्याने त्यांना त्वचाविकारानेही ग्रासलं आहे.

साधारण आठवड्याभरासाठी रुग्णालात दाखल झालेली ही अभिनेत्री म्हणजे मुमताज. आपल्याला काही दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं हे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान माध्यमांना सांगितलं. Irritable Bowel Syndrome and Colitis चा त्रास झाल्यामुळं त्यांना अडचणी जाणवल्या शिवाय त्यांना अतिसाराचा झटका आल्याचंही समोर आलं. परिणामी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

बरेच उपाय आणि औषधं करुनही अतिसार थांबत नसल्याचं त्यांनी सांगितलं. रुग्णालयात गेलं असता आपल्याला संवेदनशील त्वचेमुळंही काही त्रास झाल्याची माहिती त्यांनी दिली. ‘माझ्या त्वचेला दरम्यानच्या काळात बराच त्रास झाला. मुलची इराणची नागरिक असल्यामुळं माझी त्वता फार संवेदनशील आहे’, असं सांगत त्यांनी उपचारांची माहिती दिली. सध्या मात्र मुमताज यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. येत्या काळात त्या आरोग्याचीच काळजी घेताना दिसतील.

७४ वर्षीय मुमताज यांनी १९५८ मध्ये बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपट विश्वात पदार्पण केलं होतं. तेव्हापासून पुढेही त्या बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकल्या. दो रास्ते, दुश्मन, अर्पण, रोटी,आपली की कसम, खिलौना, प्रेमकहानी, सच्चा झूठा अशा अनेक ब्लॉकबस्टर सिनेमात मुमताज ने उत्कृष्ट अभिनय करत चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले. १९७४मध्ये त्यांनी मयुर माधवानी या व्यावसायिकाशी लग्नगाठ बांधली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.