पहा मराठमोळ्या अभिनेता भरत जाधव आणि सरिता जाधव यांची अरेंज मॅरेजवाली लव्ह स्टोरी..

0

मराठी सिनेसृष्टीचा कलाकार आणि नाटकाच्या दुनियेतील अतूट तारा म्हणजे भरत जाधव. ‘श्रीमंत दामोदर पंत’ बनून सर्वांना माणूस असल्याची जाणीव करून देणारा भाबडा भरत आणि “बकुळा नामदेव घोटाळे” मध्ये खेळी करणारा सरपंच घोटाळे… साकारून भरत जाधवने मराठी सिनेमा आणि नाट्यप्रेमींच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. गलगले निघाले मधील त्याने साकारलेला भोळा गलगले कोणीही विसरू शकत नाही. तर जत्रा सारख्या सिनेमात लोकांना पोट धरून हसवणारं त्याचं व्यक्तिमत्त्व आजही आपल्याला आकर्षित करतं.

आजही तो नाट्य जगतात आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकण्यात गुंग आहे आणि याचे सर्व श्रेय तो आपली पत्नी सरीताला देतो. प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो म्हणतात. भरत जाधवच्या आयुष्यात ती स्त्री म्हणजे त्याची बायको सरिता आहे. आज त्यांची प्रेमकहाणी सांगणार आहोत. तस पाहता भरत आणि सरिताच लग्न हे अरेंज मॅरेज पद्धतीने केलेले आहे. आई- वडिलांच्या आवडीने या दोघांचा विवाह झाला हे पटणे लोकांना आजही थोडेसे जड जाते. पण हे खरे आहे…

View this post on Instagram

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)


भरत जाधव हा खूप सामान्य कुटुंबात वाढलेला माणूस आज सर्व स्तरातील लोकांच्या मनात वसतो. हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. या प्रवासात त्यांची हमराह बनून सरिताने त्याला खूप साथ दिली हे भरत नेहमी सांगत असतो. सरिताने घरची जबाबदारी सांभाळली म्हणून मी आज पट्टीचा कलाकार होऊ शकलो आयुष्याच्या चढ- उतारामध्ये सरिताने मला मोलाची साथ दिली आहे, असंही तो म्हणाला होता. आपल्या यशात तो सरिताला वाटा द्यायला तो कधीच विसरत नाही.

सरिताला जेव्हा त्यांच्या नात्याबद्दल विचारले गेले तेव्हा पहिल्या भेटीचा किस्सा तिने सांगितला होता, जेव्हा ते दोघे पहिल्यांदा भेटणार होते त्यावेळी भरतने तिच्या ऑफिस मध्ये फोन केला होता. त्यानंतर जेव्हा ती वरिष्ठांकडे गेली तेव्हा “तू उद्या येशील ना” अशी थट्टा देखील त्यांनी केली होती. आपल्याला भेटल्यावर बोलायला निवांत बोलता यावं म्हणून भरतने सिनेमाची तिकिटे काढली होती आणि त्यांची भेट सिनेमा घरात झाली होती.. अशी होती सरिता आणि भरत जाधव यांची अरेंज मॅरेज वाली लव्ह स्टोरी…

Leave A Reply

Your email address will not be published.