बॉलिवूड मधील या अभिनेत्रींच्या मुली हि नाहीत त्यांच्यापेक्षा कमी सुंदर, शेवटच्या अभिनेत्रीची मुलगी आहे सर्वात सुंदर..
बॉलिवूडमध्ये सध्या अनेक सुंदर अभिनेत्री आहेत. अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. पण आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींबद्दल नाही तर त्यांच्या सुंदर मुलींबद्दल सांगणार आहोत. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींच्या मुली सौंदर्याच्या बाबतीत त्यांच्या आईपेक्षा कमी नाहीत. चला तर जाणून घेऊया..
समायरा कपूर
भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरच्या मुलीचे नाव समायरा कपूरआहे. सौंदर्याच्या बाबतीत समायरा तिची आई करिश्मा कपूरपेक्षा कमी सुंदर दिसत नाही. अलीकडेच समायराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटो मध्ये ती खूप सुंदर आणि स्टायलिश दिसत होती. तिच्या या फोटोला लोकांनी खूप पसंद केले.

न्यासा देवगण
न्यासा देवगण हि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल-अजय यांची मुलगी आहे. सध्या ती परदेशामध्ये शिक्षण घेत आहे. ती हि तिच्या आई सारखी खूप सुंदर दिसते. सध्या शिक्षणामुळे ती जास्त लाइमलाइट मध्ये, चर्चेमध्ये नसते. सोशल मीडियावरही न्यासा देवगणची छायाचित्रे अनेकदा व्हायरल होतात, जी चाहत्यांना खूप आवडतात.
View this post on Instagram
जान्हवी कपूर
जान्हवी कपूरला आता सर्व चांगल्या प्रकारे ओळखतात. जान्हवी कपूरच्या वडिलांचे नाव बोनी कपूर आहे, जे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते आहेत आणि जान्हवी कपूरची आई दिवंगत श्रीदेवी त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. श्रीदेवी यांना भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली महिला सुपरस्टार म्हटले जाते. जान्हवी कपूर तिच्या आई श्रीदेवीसारखी खूप सुंदर दिसते. ६ मार्च १९९७ रोजी जन्मलेल्या जान्हवी कपूरने “धडक” चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
View this post on Instagram
राशा थडानी
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानीची छायाचित्रे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. रवीना टंडन तिच्या मुलीचे फोटो चाहत्यांमध्ये शेअर करत राहते, जे चाहत्यांना खूप आवडतात. राशा थडानी तिच्या आईसारखीच सुंदर आहे.
View this post on Instagram
सारा अली खान
सारा अली खान अमृता सिंगची मुलगी आहे. सारा अली खानची आई देखील तिच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. साराने २०१८ मध्ये “केदारनाथ” चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. प्रसिद्ध स्टार किड्सच्या यादीत सारा अली खान सर्वात लोकप्रिय आहे. ती तिच्या आईसारखीच सुंदर दिसते.
View this post on Instagram