कौतुकास्पद: जेव्हा सर्कल इंस्पेक्टर वडिलाने केला आपल्याच DSP मुलीला सलाम, फोटो झाले इंटरनेटवर व्हायरल..

0

कोणत्याही पालकांचे स्वप्न असते की त्यांची मुले आयुष्यात त्यांच्यापेक्षा पुढे जावीत. त्यांच्यापेक्षा मोठा दर्जा त्यांना मिळवा आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा त्यांचा पालकांना अभिमान वाटेल. असेच सगळ्या पालकांना वाटते. पण, प्रत्येक्ष अशी एक घटना आंध्र प्रदेशमध्ये पाहायला मिळाली आहे जिथे एक सर्कल इन्स्पेक्टर वडील आपल्या डीएसपी मुलीला सलाम करताना दिसत आहेत. चला तर मग बघूया नेमकं काय झालं आहे.

त्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये वडील तिच्या डीएसपी मुलीला सेल्यूट करताना दिसत आहेत जे त्यांच्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. सर्कल इन्स्पेक्टर वाय श्याम सुंदर यांच्यासाठी अभिमानास्पद क्षण होता जेव्हा त्यांनी त्यांची मुलगी हिला सेल्यूट केले. जेसी सध्या गुंटूर जिल्ह्यात डीएसपी म्हणून तैनात आहेत. दोघेही आंध्र प्रदेश राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी तिरुपतीमध्ये होते, जे ४ ते ७ जानेवारी दरम्यान आयोजित केले होते.

Third party image reference

२०१८ च्या बॅचचे पोलीस अधिकारी जेसी पोलीस खात्यात रुजू झाल्यानंतर प्रथमच तिच्या वडिलांसोबत समोरासमोर आली. गुंटूरच्या डीएसपीने सांगितले की जेव्हा तिने तिच्या वडिलांना स्वतःला सेल्यूट करताना पाहिले तेव्हा तिला खूप वेगळा अनुभव येत होता.

त्यावेळी ती बोलताना म्हणाली कि- कर्तव्यावर आम्ही दोघे पहिल्यांदा भेटलो होतो. मी त्यांना म्हणाली की मला सेल्यूट करू नका. पण त्यांनी सेल्यूट केल्यानंतर मी सुद्धा त्यांना सेल्यूट केला. माझे वडील माझे प्रेरणास्थान आहेत. मी त्यांना पाहून आणि विश्वासाने लोकांची सेवा करून मोठी झाली आहे. त्यांनाही लोकांना जमेल तशी मदत केली आहे. यामुळेच मला या विभागात सामील होण्यासाठी प्रेरणा त्यांच्यामुळेच मिळाली.

या दोघांचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाला आहे आणि लोकही त्यांचा आनंद तीव्रतेने व्यक्त करत आहेत. गुंटूरचा हा फोटो प्रत्येक चेहऱ्यावर हास्य आणत आहे. आंध्रप्रदेश पोलिसांनी हा फोटो पोस्ट केला होता. हा फोटो ३ जानेवारीला क्लिक करण्यात आला होता, ज्याला सोशल मीडियावर आल्यानंतर कमी वेळातच  हा  फोटो खूप व्हायरल झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.