निधनानंतर मागे इतकी संपत्ती सोडून गेले क्रिकेटर Shane Warne.. आहे Lamborghini, Ferrari सारख्या गाड्यांनी भरलेलं गॅरेज..

0

सध्या क्रिकेट जगतातील सगळ्यांवर शोककळा पसरली आहे. कारण नुकताच ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉर्न याने या जगाचा अचानक निरोप घेतला. वयाच्या ५२ व्या वर्षी त्याचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. तो एक उत्कृष्ट गोलंदाज होता. त्याचे जगभरात लाखो चाहते आहेत, ज्यांनी त्याच्या निधनानंतर विविध प्लॅटफोर्मवर हळहळ व्यक्त करत भावनिक पोस्ट लिहिल्या आहेत.

अजूनही तो मृत्यू पावला आहे हे पचवणे सर्वाना अवघड जात आहे. कमी वेळेत भरपूर प्रसिद्धी मिळवत त्याने जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. तो एक पट्टीचा खेळाडू तर होताच याशिवाय तो एक उत्तम व्यक्ती देखील होतं. व्यक्तिगत आयुष्यात त्याने आपल्या चांगल्या कामाने नाव कमावले आहे. जे आता अजरामर झाले आहे.. त्याच्याबद्दल भारतीय क्रिकेटपटूंनी देखील त्याच्या अचानकपणे जाण्यावर दुख व्यक्त केले आहे.

शेन वॉर्न हा एक उत्कृष्ट खेळाडू असण्याबरोबरच एक श्रीमंत व्यक्तीदेखील आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्या श्रीमंती आणि एका अनोख्या शौक बद्दल सांगणार आहोत. एका रिपोर्टनुसार त्याची एकूण संपत्ती ५० मिलियन इतकी आहे तर त्याच्याकडे २० हून अधिक फरारी आणि लाबोर्णगिनी आहेत. त्याच्या घरी असलेल्या अलिशान गरेज मध्ये २० मोठाल्या गाड्या आहेत. त्याला एकदा विचारण्यात आले होते की, तुम्हाला कोणत्या गाड्या आवडतात, त्याने सांगितले की, त्याला वेगाची खूप आवड आहे त्यामुळे फेरारी आणि लाम्बोर्गिनी सारख्या गाड्यांचे २० कार असलेले गरेज आहे.

ज्यामध्ये दोन सीटर F type jaguar देखील समाविष्ट आहे. त्याच्या या गरेजमध्ये कोट्यावधी रुपयांची BEntley Continental supersports आणि Bugatti Veyron अशा आलिशान कार होत्या. यासोबत २ मर्सिडीज कार, २ BMW आणि Holden VK Commodore सारख्या गाड्यांचा देखील समावेश होता.आपल्या वडिलांमुळे त्याला हा गाड्यांचा छंद जडला असे त्याने एकदा सांगितले होते.

शेन वॉर्न हा जगातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. त्याची एकूण संपत्ती ३८५ कोटी अर्थात ५० मिलियन डॉलर इतकी आहे. वॉर्न याने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण १४५ सामने खेळले आहेत. तर कसोटीमध्ये ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये तो जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. २००७ साली त्याने आपली शेवटची कसोटी खेळली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.