‘आता पुढचा प्रवास हिच्यासोबत..’ देवमाणूस फेम या अभिनेत्याने पोस्ट शेअर करत दिली गुड न्युज..
झी मराठी वाहिनीवरील बहुतेक मालिका प्रसिद्धच असतात. अशा अनेक मालिकांमधून कित्येक कलाकारांना नवी ओळख मिळवून दिली आहे. याप्रमाणेच ‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ अशा गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे किरण गायकवाड.
आपल्या उत्तम अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या किरणला खरी लोकप्रियता देवमाणूस या मालिकेमुळे मिळाली. त्यामुळे सोशल मीडियावर तो नेहमी चर्चेत असतो. किरणचा फारच कमी वेळेत प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण झाला असून त्याच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यामध्येच आता किरणने चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे.
किरण गायकवाडने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या घरी आलेल्या नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या नव्या पाहुण्याची ओळख करुन देताना त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत आहे.
किरणने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या घरचा नवा पाहुणा म्हणजे त्याची नवी कोरी करकरीत कार आहे. किरण गायकवाडने पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन गाडी खरेदी केली असून ही गुडन्यूज त्याने चाहत्यांना दिली आहे.”आता पुढचा प्रवास हिच्यासोबत “असं कॅप्शन देत त्याने त्याच्या नव्या कारसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. किरण सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असून अनेकदा तो त्याच्या वैयक्तिक जीवनातील गोष्टी चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असतो.
View this post on Instagram
किरण गायकवाड याने साकारलेली देवमाणूस मालिकेतील डॉक्टर अजितकुमार देवची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे पहिल्या सिझन नंतर या मालिकेचा दुसरा भाग येण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते. पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागाला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. दरम्यान देवमाणूस२ मध्ये नटवर सिंगच देवमाणूस असून या भूमिकेसाठी अभिनेता किरण गायकवाड याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे.
याविषयी बोलताना तो म्हणाला, “जेव्हा मला कळलं कि नटवर सिंग हा राजस्थान मधला हातचलाखी करणारा माणूस आहे तेव्हा मी त्या ट्रिक्स शिकलो, जादूचे प्रयोग करण्याचे टिप्स फॉलो केल्या. राजस्थानी भाषेचं प्रशिक्षण घेतलं. आम्ही राजस्थानमध्ये शूटिंग सुरु केलं तेव्हा त्याच्या एक दिवस आधी मी तिथे मार्केटमध्ये फिरत होतो. तिथे मी लोकांचं निरीक्षण करत होतो. त्यांचा लहेजा आत्मसात करण्याचा प्रयत्न करत होतो.”
इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता.. आणि तो आता यशाच्या मार्गावर सक्रिय आहे. त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!