केजीएफ २ मधील रॉकीच्या गर्लफ्रेंडबद्दल जाणून घ्या..आधी करायची हे काम, नंतर..

0

सध्या बॉक्स ऑफिसवर राज करणारा सिनेमा म्हणजे केजीएफ २.. या सिनेमाने ११ दिवसात ८८० कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट १००० क्लबमध्ये सामील होण्याच्या मार्गावर आहे. आणि ते येत्या काही दिवसातच शक्य होऊ शकते. डायरेक्टर प्रशांत नील यांच्या दमदार दिग्दर्शनाने हा सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडत आहे. त्याचे हिंदी व्हर्जनही धुमाकूळ घालत आहे, ज्याने आतापर्यंत ३७५ कोटींची कमाई करून इतिहास रचला आहे.

या चित्रपटातील इतर पात्राप्रमाणे श्रीनिधीच्या भूमिकेचेही सर्वत्र कौतुक होत असून या यशामुळे ती खूप खूश आहेअभिनेत्री श्रीनिधी शेट्टी हिने केजीफ चॅप्टर १ चित्रपटाच्या केजीएफ: चॅप्टर १ मधूनच तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आणि पहिल्याच चित्रपटातून ती इंडस्ट्रीत लोकप्रिय झाली. श्रीनिधीने फार कमी वेळात इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे. तिने आतापर्यंत प्रशांत नीलच्या दोन चित्रपटात काम केले आहे आणि दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. श्रीनिधी शेट्टीनं चित्रपटामध्ये काम करण्यासाठी तीन कोटींचे मानधन घेतलं आहे.

या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता ती लवकरच कोब्रा या तमिळ चित्रपटात दिसणार आहे. त्याचे शूटिंग पूर्ण झाले असून त्याचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. कोब्रा या चित्रपटातून ती कॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. खरेतर श्रीनिधीचे स्वप्न अभिनेत्री होण्याचे अजिबात नव्हते. कारण तिला नेहमीच डॉक्टर बनण्याची इच्छा होती. पण तिने सुरुवातीचे शिक्षण श्री नारायण गुरु इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घेतले आणि त्यानंतर त्यांनी जैन युनिव्हर्सिटी, बेंगळुरू येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.

तरीही सध्या तिने आपल्या अभिनय आणि मनमोहक सौंदर्याने तिने चाहत्यांना भुरळ घातली आहे यात शंका नाही. श्रीनिधी शेट्टी अनेक ठिकाणी दिसली आहे. लोकप्रिय मॉडेल असून मिस दिवा २०१६ आणि मिस सुपरनॅशनल २०१६ हा किताब पटकावला आहे. तिला केजीएफ चॅप्टर१ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ८व्या SIIMA सोहळ्यादरम्यान सन्मानित करण्यात आलं होतं.यासोबतच तिला ६६व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.

केजीएफ चॅप्टर २ मध्ये ती रॉकी अर्थात यशसोबत रोमान्स करताना दिसून येणार आहे. चित्रपटातील तिच्या या नव्या लुकवर सगळेच फिदा झाले आहेत. ती अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. आणि सध्या खूपच लोकप्रिय ठरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.