रोहित शेट्टीने दिली चाहत्यांना मोठी खुशखबर…लवकरच ‘सर्कस’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला..

0

बॉलिवुडमधील डेयरडेव्हिल डायरेक्टर म्हणून प्रसिद्ध असलेला डायरेक्टर रोहित शेट्टी आपल्या अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांसाठी ओळखला जातो. त्याच्या सिनेमातील स्टंट्स आणि ॲक्शन चे जगभरात लाखो फॅन्स आहेत.

बिग बजेट आणि अफलातून कहाणी यांची सांगड घालत तो नेहमीच प्रेक्षकांसाठी उत्तम सिनेमे बनवत असतो. गोलमाल, सिंघम, अशा लक्षात राहणाऱ्या सिनेमांची निर्मिती करून त्याने बॉलिवुडला कॉमेडी आणि ॲक्शन चे उत्कृष्ट नमुने दिले आहेत.

आता रोहित शेट्टीच्या फॅन्स करता एक खुशखबर समोर आली आहे. लवकरच तो एक बँग ऑन सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. याची माहिती त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केली आहे. रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर ‘सर्कस’ या त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे.

“आपल्या प्रेक्षकांना सिनेमागृहात परत आणण्याची वेळ आली आहे… पुन्हा एकदा! गोलमाल १६ वर्षांपूर्वी रिलीज झाला आणि तुम्हा सर्वांचे प्रेम आहे. मी आज जे आहे ते मला तुमच्या प्रेमाने दिले! ‘सर्कस’ ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी ख्रिसमसची भेट आहे! क्यूंकी इस ‘सर्कस’ में बोहोत सारा गोलमाल है!!!” असं कॅपशन देत रोहितने ही खुशखबर दिली आहे. रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटामध्ये देखील मनोरंजनाचा डबल डोस प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सोबतच हा सिनेमा मल्टी स्टारर सिनेमा असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये कलाकार विविध भूमिका साकारत असल्याचे दिसत आहेत. तसेच रणवीर सिंगचा यामध्ये डबर रोल असल्याचं दिसत आहे. एक भूमिका अगदी साधी तर दुसरी भूमिका एकदम बिनधास्त असल्याचं दिसून येतंय. तसेच अभिनेता वरुण शर्मा देखील या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये पाहायला मिळणार आहे. पोस्टरमध्ये इतर कलाकार रेट्रो लूकमध्ये दिसत आहेत. या चित्रपटामध्ये हिंदीमधील टॉपच्या अभिनेत्री देखील काम करताना दिसणार आहेत.

रोहित शेट्टीने रणवीर सिंग, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, वरुण शर्मा, जॉनी लीव्हर, संजय मिश्रा आणि इतर अभिनीत आपला पुढील चित्रपट सर्कसचे शुटींग पूर्ण केला आहे. विल्यम शेक्सपियरच्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ या नाटकाचे रुपांतर असलेला हा चित्रपट आहे. गेल्या वर्षी शूटींगला सुरुवात झाली होती आणि महामारीच्या काळात पूर्ण झालेल्या काही चित्रपटांपैकी एक होता. सर्कसचे दिग्दर्शन आणि निर्मिती करणाऱ्या चित्रपट निर्मात्याने या महिन्याच्या सुरुवातीला अर्धे गाणे आणि काही दृश्ये उटी येथे शूट केली आणि सध्या पोस्ट-प्रॉडक्शन आणि संपादन चालू आहे. सर्कस हा २०२२मधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असल्याचे म्हटले जाते आहे. यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.