जय श्री कृष्णा या प्रसिध्द मालिकेतील बालकृष्ण आता झाला मोठा, व्हायरल होणारे फोटो पाहून व्हाल थक्क..
टिव्हीवर सर्वात आधी फेमस काही असेल तर ते म्हणजे देवा दिकांवर आधारित मालिका.. संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहत असायचे. मनोरंजनासोबत लहानग्यांवर संस्कार करणारे हे सिरीयल आजही लोकप्रिय आहेत. रामायण, महाभारत आणि श्री कृष्णा.. हे आपले आवडते देवता आहेत. ज्यांच्या मालिका आजही लोकं आवडीने पाहतात. अशीच एक लोकप्रिय सिरीयल म्हणजे जय श्री कृष्णा..
कलर्स चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेतील बालकृष्णाने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले होते. त्याची क्यूट स्माईल आणि बोलक्या डोळ्यांनी प्रेक्षकांना आपलेसे केले होते. त्याच्या त्या अवखळ खेळीनी सर्वांना खिळवून ठेवले होते. या मालिकेमुळे कितीतरी काळ कलर्स चॅनेल चर्चेत होते. प्रेक्षक न चुकता ही सिरीयल पाहत असत.
नुकताच या मालिकेत बाल कृष्णाचे पात्र साकारणाऱ्या बाल कलाकाराचे फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा जणू धक्काच बसला आहे. आपल्या गोंडस रूपाने सर्वाचे मन मोहणारा हा बाळकृष्ण खऱ्या आयुष्यातही बाळकृष्ण असेल असे सर्वांना आजपर्यंत वाटत आले आहे. पण हा बाळकृष्ण मुलगा नसून मुलगी आहे आणि आता खूपच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
बालकृष्णाची भूमिका साकारणारी ही गोंडस मुलगी आहे धृति भाटिया… धृती भाटिया ने तंतोतंत बाल कृष्ण साकारून चाहत्यांना आकर्षित केले होते. ती आता तरुण वयात पदार्पण करते आहे. सोशल मीडियावर तिच्या व्हायरल झालेल्या फोटोंमुळे ती चर्चेत आहे. तिने नुकताच आपल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. जो प्रचंड व्हायरल झाला आहे.
तिला अभिनय आणि डान्सची प्रचंड आवड आहे. त्यामुळे तिला या क्षेत्रातच करियर करायचे आहे. तिने जय श्री कृष्णा नंतर स्टार प्लस वाहिनीवरील इस प्यार को क्या नाम दू आणि डोन्ट वरी चाचू या मालिकेत दिसून आली आहे. या मालिकेतही तिने कौतुकास्पद काम केले आहे. तिचे बोलके डोळे तिला अजूनच सुंदर बनवतात. आपल्या मोहक चेहऱ्याने ती आता सोशल मीडियावर वाहवाही लुटत आहे. तिला तिच्या करियर विषयी विचारल्यानंतर तिने मला कोरियोग्रफर बनायचे असल्याचे सांगितले..