करिश्मा पुन्हा होणार नवरी? आलिया रणबीरच्या लग्नात घडले असे काही ज्यामुळे करिश्मा आली चर्चेत..

0

बॉलिवूडमधील क्यूट कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचंही साधेपणानं पण कपूर खानदानाच्या उत्साहात लग्न झालं. या लग्नासाठी नटून थटून आलेली कपूरकन्या करिश्मा हिच्यासाठी एक आनंदाची हिंट देणारी घटना घडली आणि पुन्हा एकदा कपूरांची लेक नवरी बनणार का याची चर्चा सुरू झाली.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नात पंजाबी परंपरेनुसार विधी करण्यात आले. या लग्नातील मेहंदीपासून ते वेडिंग पार्टीपर्यंत नवरी आलियाच्या नणंदांचा थाट पाहण्यासारखा होता. यामध्ये मोठी नणंद म्हणून करिश्मा कपूरनेही तिची सगळी हौस पुरवून घेतली.आलियाच्या मेहंदी सोहळ्यात ब्राउन रंगाच्या घेरदार अनारकलीमध्ये करिश्माचं सौंदर्य तर खुललंच पण तिने पायावर काढलेल्या हटके मेहंदीचीही खूप चर्चा झाली. लाडक्या भावाच्या लग्नासाठी करिेश्माने पांढऱ्या डिझायनर साडीवर कलरफूल ब्लाउज असा लूक करत नजरा खिळवून ठेवल्या होत्या. पण करिश्माची खरी चर्चा रंगली ती आलियाच्या हातातील कलिरा जेव्हा करिश्माच्या डोक्यावर पडला तेव्हा.

आलिया आणि रणबीर यांची लग्नगाठ बांधण्याचा मानही करिश्मालाच होता. त्यानंतर जेव्हा आलियाने कलिरा हलवला तेव्हा तो करिश्माच्या डोक्यावर पडला. कलिरा जिच्या डोक्यावर पडतो तिचे लवकरच लग्न होतं, या पंजाबी परंपरेनुसार करिश्मा पुन्हा नवरी होऊ शकतं, असं मानून कपूर कुटुंबातील प्रत्येकानेच तिचं अभिनंदन केलं.

करिश्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. डोक्यावर पडलेला कलिरा दाखवत करिश्माने तिच्या इन्स्टावर शेअर केलेल्या फोटोला कलिरा माझ्या डोक्यावर पडला अशी कॅप्शन केली आहे. या फोटोत ती खूपच आनंदी दिसत आहे. या फोटोवर तिची बहीण रिध्दीमा साहनी हिनेही बेस्ट अशी कमेंट केली आहे.

सोबतच करिश्मा कपूरने अलीकडेच चाहत्यांसह सोशल मीडियावर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन घेतलं होतं. जिथे तिने तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल जीवनाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. या प्रश्नांची उत्तर देताना करिश्माने तिच्या लग्नाबाबत अतिशय मजेशीर उत्तरही दिलं. यावेळी एका चाहत्याने विचारलं तुला पुन्हा लग्न करायचं आहे का? या प्रश्नाला टाळण्याऐवजी लग्नावर करिश्माने उत्तर देणं योग्य मानलं. करिश्माने हे उत्तर इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलं आहे. जे प्रचंड व्हायरल झाले.

लग्नाच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी करिश्माने गोंधळलेल्या मुलीचा चेहरा शेअर केला. तीन फोटो शेअर करून, करिश्माने लग्न शेवटी वेळ आणि परिस्थितीवर अवलंबून असेल असं म्हटलं. सध्या करिश्मा कपूर तिच्या आगामी क्राईम ड्रामा ‘ब्राऊन’ मध्ये व्यस्त आहे.

२००३ साली करिश्माचे उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न झालं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. २०१२ पासून ते वेगळे राहू लागले. करिश्माच्या लग्नाची आणि तिच्या घटस्फोटाची खूप चर्चा झाली. बॉलिवूडमधील सर्वात महागड्या घटस्फोटापैकी एक करिश्माचा घटस्फोट आहे. सध्या ती विविध ब्रँडशी जोडलेली असून अभिनय न करताही महिन्याला ८७ कोटी रूपये कमावते.

Leave A Reply

Your email address will not be published.