लवकरच येणार KGF 3.. चाहत्यांसाठी आली सर्वात मोठी बातमी समोर..

0

सध्या बॉक्स ऑफिसवर दक्षिणात्य सिनेमा KGF2 या सिनेमाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सिनेमाच्या दोनही भागांनी जगभरातील प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. सिनेमातील डायलॉग्ज, सीन्स आणि सिनेमाच्या स्टोरीने चाहत्यांना वेड लावले आहे.

‘केजीएफ 2’चा  शेवट पाहून प्रेक्षकांनी  तिसऱ्या भागाचा कयास बांधण्यास सुरुवात केली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाचे निर्माते कार्तिक गौडा यांनी पुढील भागाच्या अर्थात KGF 3च्या प्री-प्रोडक्शनच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, त्यांनी या संदर्भात अधिक माहिती जाहीर केलेली नाही.

KGF Chapter 3’ येणार की नाही? या प्रश्नावर उत्तर देताना चित्रपटाचा मुख्य अभिनेता यश याने म्हटले की, चित्रपटाच्या तिसर्‍या भागाबाबत त्याची आणि चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यात आधीच चर्चा झाली आहे. प्रशांत नील यांना याच्या सीक्वेन्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यावर त्यांनी सांगितले की, ‘याबद्दल काही बोलणे घाईचे ठरेल. पण जर लोकांना KGF: Chapter 2 आवडत असेल, तर आम्ही फ्रेंचायझी सुरू ठेवण्याचा विचार करू शकतो.रॉकीच्या आयुष्यात आणि या कथेत खूप काही आहे. हे तिसऱ्या पार्टमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार. मी आणि प्रशांत आम्ही दोघांनी ‘केजीएफ 3’साठी खूप सीन्सचा विचार केला आहे. डोक्यात अनेक कल्पना आहेत. अनेक गोष्टी आम्ही ‘केजीएफ 2’ करू शकत नव्हतो. ती सर्व कसर आम्ही ‘केजीएफ 3’मध्ये भरून काढणार आहोत, असं यश म्हणाला.

केजीएफ १’ रिलीज झाला तेव्हा यश काहीसा टेन्शनमध्ये होता. कारण प्रशांत नील यांनी ‘केजीएफ’ या केवळ एका चित्रपटाचा विचार केला होता. म्हणजे, याचा सीक्वल वा तिसरा पार्ट बनवण्याचा कोणताही इरादा नव्हता. पण प्रॉडक्शनचं काम अर्ध पूर्ण झाल्यावर टीमने स्क्रिप्टवर पुन्हा नव्यानं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम म्हणजे, स्क्रिप्ट दोन भागात तयार झाली. ‘केजीएफ 1’ ब्लॉकबस्टर ठरल्यावर मेकर्सनी लगेच ‘केजीएफ 2’चं काम सुरू केलं..

केजीएफ 3’मध्ये सीआयएच्या एन्ट्रीनंतर काय होणार? रमिका सेन रॉकीविरोधात डेथ वॉरंट काढणार का? रॉकी मरणार की जगावर राज्य करण्याचं आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करणार? हे जाणून घेण्याची चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं चाहत्यांना मिळणार आहेत. अर्थात त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण ‘केजीएफ 3’ येणार हे निश्चित आहे. खुद्द सुपरस्टार यशने  हे कन्फर्म केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.