Ms धोनी चित्रपटाच्या शुटींग दरम्यानच कियाराने सुशांतला सांगितले होते हे सत्य..एक दिवस तुझ्यावर..
बॉलीवुडने गेल्या काही काळात अनेक दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेत्यांना गमावले. मल्टी स्टारर आणि बहुगुणी असे कलाकार चाहत्यांनी गमावले. काही काळ घेऊन गेला तर काहींचा काळ त्यांना घेऊन गेला. अनेकांना आपले आवडते कलाकार गेले म्हणून दुःख झाले पण अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला होता. त्याच्या मृत्यूला दु:ख अजूनही बरेच लोक विसरलेले नाहीत. त्याच्या आत्महत्येप्रकरणी कित्येक दिवस खटले चालले. पण त्यांच्या निकालाची वाट आजही त्याचे चाहते पाहत आहेत.
अलीकडेच बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी हिनेही सुशांतबद्दल आपले आठवणी सांगून सुशांतच्या चाहत्यांना पुन्हा एकदा भावूक केलं. सुशांत आणि कियाराने ‘M.S. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ एकत्र काम केलं होतं. या सिनेमात कियाराने धोनीच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
कियारा अडवाणी सध्या तिचा आगामी चित्रपट ‘भूल भुलैया 2’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान कियाराला तिचा जुना मित्र आणि सहअभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण झाली. कियाराने साल २०१६ मध्ये आलेल्या ‘M.S. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचे काही अनुभव सांगितले, ‘आम्ही औरंगाबादमध्ये आम्ही एका गाण्याचे आणि काही दृश्यांचे शूटिंग करत होतो.’
मला आजही आठवतं की, आम्ही रात्री आठच्या सुमारास पॅकअप केलं, दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता आमची फ्लाइट होती. म्हणूनच आम्ही संपूर्ण रात्रभर गप्पा मारल्या.
कियाराने सांगितले की, सुशांत सिंह राजपूत सांगायचा की, तो एक अभियंता होता, प्रिती झिंटासोबत त्याने बॅकअप डान्सर म्हणूनही काम केलं. सोबतच सुशांतला धोनी सिनेमा कसा मिळाला या सर्व गोष्टी त्याने सांगितल्या. त्याच्याकडे नेहमी मोठी पुस्तके असायची, जी तो सतत वाचायचा. तो जीवनाबद्दल, लोकांबद्दल खूप उत्सुक होता. ही सर्व त्याची कहाणी ऐकून कियारा म्हणाली होती की, एक दिवस कोणीतरी तुझ्यावर बायोपिक बनवेल.
कियारा पुढे म्हणाली की, सुशांत त्याच्या कामाबद्दल खूप उत्साही होता. तो फक्त दोन तास झोपायचा आणि सांगायचा की, माणसाला फक्त दोन तासांची झोप गरजेची आहे. एखादी व्यक्ती कितीही झोपली तरी त्याच्या मेंदूला फक्त दोन तास विश्रांतीची गरज आहे. दोन तासांच्या झोपेनंतरही तो दुसऱ्या दिवशी तितकाच फ्रेश दिसत असे. हे सर्व अनुभव सांगत असताना ती भावूकही झाली होती.