मलायका अरोराची प्रकृती आता कशी आहे? बहीण अमृता अरोराने दिली माहिती..

0

बॉलीवूड ची मुन्नी म्हणून प्रसिद्ध असलेली मलायका अरोरा नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. ती एक मॉडेल असून आपल्या फॅशन सेन्स आणि विविध प्रकारच्या पोस्ट मुळे चर्चेत असते. दरम्यान ती अर्जुन कपूरसोबतच्या अफेयर मुळे सोशल मीडियावर ट्रोल होत होती. आणि काही ना काही कारणामुळे वारंवार चर्चेत होती. आणि सध्याही आहे. कारण काल 2 एप्रिलला अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी आली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

पुण्यात एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी मलायका घरून निघाली होती. यादरम्यान मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोलीनजीक बोरघाटात तिच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर मलायकाला तातडीने अपोलो रूग्णालयात भरती करण्यात आलं.

मुंबई-पुणे हायवेवर मोठ्या प्रमाणात ट्राफिक झाल्याने अचानक ब्रेक लावल्याने तीन ते चार गाड्या एकावर एक आदळल्या. अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या गाडीची ठोकर एका स्विफ्ट गाडीला लागल्याने मलायका अरोराही किरकोळ जखमी झाली आहे. तिच्या गाडीत ड्रायव्हर आणि तिचा बॉडीगार्ड होता मात्र त्यांना काहीही दुखापत झाली नसून अभिनेत्री मलायका अरोरा हिला दुखापत झाली आहे. तर गाडीचे समोरून मोठे नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये सोलापूर येथून आलेल्या मनसैनिकांच्या बसचाही समावेश आहे.

सध्या मलायकाची प्रकृती कशी आहे?हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते काळजीत पडले आहेत. दरम्यान तिची बहिण अमृता अरोरा हिने तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

इंडिया टुडे’शी बोलताना अमृताने मलायकाचं हेल्थ अपडेट दिलं. मलायकाची प्रकृती आता आधीपेक्षा बरी आहे. तिच्या प्रकृतीत वेगाने सुधार होत आहे. काही वेळ तिला अंडर ऑब्जर्वेशन ठेवण्यात येणार आहे, असं अमृता म्हणाली. अमृताच्या एका जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, मलायकाच्या डोक्याला टाके पडले आहेत. मात्र ती धोक्याबाहेर आहे. अपघातानंतर ती शॉकमध्ये गेली होती. अपघात झाला त्यावेळी तिच्या डोक्याजवळ कुशन होतं. त्यामुळे तिला फार मोठी इजा झाली नाही. पण ती थोडक्यात बचावली.त्याआधी अपोलो हॉस्पिटलनंदेखील मलायकाच्या हेल्थबाबत अपडेट दिली होती. मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सीटी स्कॅन केल्यानंतर सर्व ठिक झालं. रात्रभर तिला अंडर ऑब्जर्वेशनमध्ये ठेवण्यात आलं. लवकरच तिला डिस्चार्ज देण्यात येईल,असं हॉस्पिटलने स्पष्ट केलं होतं.

बोरघाटात पाच-सहा वाहनं एकमेकांना धडकली. यात मलायका अरोराच्या कारचादेखील समावेश होता. यानंतर मलायका अरोराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातात मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.