नवरदेव बनला रॉकी भाई.. KGF2 च्या चाहत्याने अनोख्या पद्धतीने छापली लग्नपत्रिका.. फोटो झाला व्हायरल

0

सोशल मीडियावर कोणती गोष्ट केव्हा लोकप्रिय होईल हे सांगणे तसे महाकठीण काम आहे. कोणता ट्रेंड कोण आणि कसा सेट करेल आणि ती व्हायरल होईल याबद्दल अंदाज बांधणेही खूप अवघड आहे. दरम्यान सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल आणि ट्रोल होत असतात. आताही अशीच एक गोष्ट इतकी व्हायरल झाली आहे की, त्याचा प्रभाव चक्क दैनंदिन आयुष्यात दिसून येतो आहे. काय झालंय नक्की? असा प्रश्न तुम्हाला साहजिक पणे पडला असणारच.. तर हा लेख वाचा आणि जाणून घ्या नक्की प्रकरण आहे काय…

“वायलेंस , वायलेंस, वायलेंस… मला ते आवडत नाही. मी ते टाळतो! पण वायलेंसला मी आवडतो, मी ते टाळू शकत नाही!” साऊथ सुपरस्टार यश स्टारर ‘KGF Chapter 2’ मधील ‘रॉकी भाई’ चा हा आयकॉनिक डायलॉग ऐकला असेलच.ज्यांनी हा सिनेमा पाहिला आहे त्यांनी हा डायलॉग अनेकदा ऐकला असेल. पण लग्नपत्रिकेत खास वेगळ्या शैलीत लिहिलेला यशचा हा डायलॉग तुम्ही वाचला का? काय बसला ना आश्चर्याचा धक्का?

KGF Chapter 2 सिनेमाच्या एका चाहत्याने यशचा हा आयकॉनिक डायलॉग चक्क त्याच्या लग्नाच्या कार्डावर छापला आहे.

चाहत्यांमध्ये यशची अशी काही क्रेझ आहे की KGF हा आता फक्त एक सिनेमा नसून एक ब्रँड बनला आहे. याच कारणामुळे रॉकी भाईच्या एका चाहत्याने लग्नपत्रिकेवर ‘ वायलेंस’ चा डायलॉग रिक्रिएट केला करत तो लग्नपत्रिकेत छापला आहे. लग्नपत्रिकेचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोकांनी याला रॉकी भाईची क्रेझ म्हटले जात आहे.

१३ मे रोजी कर्नाटकातील बेळगावी येथे चंद्रशेखर नावाचा मुलगा श्वेतासोबत लग्न करणार आहे. चंद्रशेखरने त्याच्या लग्नपत्रिकेवर ‘KGF Chapter 2′ चा संवाद लिहिला आहे. होणाऱ्या नवऱ्याने यशचा प्रसिद्ध “वायलेंस’ डायलॉग वेगळ्या पद्धतीने लग्नपत्रिकेवर छापून आणला आहे.

‘लग्न, लग्न, लग्न, मला ते आवडत नाही, मी ते पुढे ढकलतो, पण माझ्या नातेवाईकांना लग्न आवडतं, म्हणूनच मी ते टाळू शकत नाही.’

सोशल मीडियावर अनेक इंस्टाग्राम, फेसबुक पेजेसवर हा डायलॉग पाहायला मिळतो आहे. या पोस्टला रेकॉर्ड ब्रेक लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. यावरून KGF 2 सिनेमाची लोकप्रियता दिसून येत आहे.

चित्रपटगृहात जेव्हा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा चाहते त्याचे संवाद रिक्रिएट करतात. वायलेंस हा डायलॉग केवळ या लग्नपत्रिकेत नव्हे तर अनेक प्रकारे रिक्रिएट केला गेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.