चक्क या सिनेमासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीने घेतले होते १ रुपयाचे मानधन..

0

बॉलिवुडमध्ये नायक खलनायक अशा जोड्या बऱ्याच प्रसिद्ध आणि लोकप्रिय होतात. पण सध्या एक असा खलनायक ट्रेंड अमध्ये आहे जो नायकाच्या भूमिकेत ही तितकाच खुलून येतो. तो अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी… या विविधरंगी कलाकाराने बॉलीवूड मध्येच नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्याने साकारलेली प्रत्येक भूमिका लक्षात राहणारी असते. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये त्याने साकारलेली छोटीशी भूमिका, ‘गँग्स ऑफ वासेपुर’ आणि ‘सेक्रेड गेम्स’मधील पॉवरफुल परफॉरमन्स, ते अगदी आता ‘हिरोपंती२’ मधील विक्षिप्त व्हिलन… या सर्व भूमिका नवाझने आपल्याशा करुन घेतल्या आहेत.

पण तुम्हाला माहित आहे का की असा एक सिनेमा आहे ज्यासाठी नवाझुद्दीन सिद्दीकीने केवळ १ रुपया मानधन घेतेले होते. या सिनेमात नवाझुद्दीन प्रसिद्ध उर्दू लेखक सआदत हसन मंटोच्या भूमिकेत दिसला होता. ‘मंटो’ ची प्रत्येक छटा अभिनेत्याने त्याच्या भूमिकेतून साकारली होती.

नवाझुद्दीनने साल २०१८ मध्ये ‘मंटो’ सिनेमात सआदत हसन मंटो यांची भूमिका साकारली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन नंदिता दास यांचे आहे. नवाझुद्दीनने या सिनेमासाठी मेकर्सकडून पैसे घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे असा प्रश्न सहज पडतो की इतक्या प्रसिद्ध कलाकाराने अशाप्रकारच्या काहीशा कठीण भूमिकेसाठी मानधन कसे काय आकारले नाही?

एका मुलाखतीमध्ये नवाझुद्दीन सिद्दीकीने असे म्हटले होते की त्यांनी चित्रपटाची कहाणी ऐकली तर त्यांना ‘मंटो’ अगदी त्याच्यासारखेच वाटले. त्यामुळे नवाझला वाटले की जर त्याने या चित्रपटातून नंदिता दास यांच्याकडून फीज घेतली तर ते आयुष्यभर त्याच्या मनात सल राहून ती त्याला खात राहील.

पण तो एक प्रोफेशनल अभिनेता आहे आणि त्याला फिल्मचा भाग व्हायचं होतं म्हणून त्याने एक रुपया फिज घेतली होती. सोबतच केवळ त्यांच्यासारखे दिसणे म्हणजे मंटो होणे असे नाही तर त्यांनी साहित्यातून समाजातील पुरुषीपणावर केलेले जे प्रहार होते ते भूमिकेतून दाखवणे जास्त महत्वाचे होते. त्यामुळे ती भूमिका करण्याचे आव्हान मी पेलेले. असेही तो म्हणाला होता.

त्याच्या त्या भूमिकाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट जगातल्या काही प्रमुख चित्रपट महोत्सवांमध्ये दाखविण्यात आला होता. ही भूमिका करताना आपल्याला आलेल्या अनुभवांविषयी नवाजुद्दीनं सांगितले आहे. तो म्हणाला ज्यावेळी ही मंटो यांच्या आयुष्यावर चित्रपट तयार केला जाणार आहे असे कळले तेव्हा मला खूप आनंद झाला. त्यांच्या साहित्याचा मी पूर्वीपासून चाहता आहे. त्यांच्या कथा मला फार आवडतात. त्यांनी साहित्यातून केलेले सामाजिक परिवर्तन मोठे काम होते. एकूण त्यांचे व्यक्तिमत्व भावले.

Leave A Reply

Your email address will not be published.