वरुण धवनच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन, आजोबा बनले डेव्हिड धवन..

0

कलाकार आणि प्रेक्षक हे नाते खूपच जुने आहे. आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी जीव ओतून काम करणारे कलाकार आणि तितकाच त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारे प्रेक्षक हे समीकरण खूपच रंजक आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर होण्याआधी प्रेक्षक अक्षरशः रांगेत उभे राहून आपल्या आवडत्या कलाकाराचा सिनेमा पाहण्यासाठी तिकीट काढत, त्यांना भेटायलाही महिने महिने वाट पाहत, त्यांच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी वर्तमानपत्रे, मॅगेझीन मधून कात्रणे काढत पण गेल्या दशकात हे चित्र पालटले आहे.

सोशल मीडियामुळे आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात काय घडतंय हे काही क्षणातच चाहत्यांना कळत. प्रेक्षकांना बॉलीवुड मधील कलाकारांचे जास्त आकर्षण असते. गेल्या काही काळात आपल्या अभिनय आणि डान्सिंगने नव्या पिढीला वेड लावणारा अभिनेता म्हणजे वरुण धवन… स्टूडेंट ऑफ द इअर या करण जोहरच्या सिनेमातून बॉलिवुड मध्ये पदार्पण करणाऱ्या वरुण धवनचे आज जगभरात लाखो फॅन्स आहेत. वरुण बॉलिवुड मधील प्रख्यात दिग्दर्शक डेविड धवन यांचा मुलगा आहे. सध्या सोशल मीडियावर धवन कुटुंबात आलेल्या खुश खबरीची बातमी व्हायरल झाली आहे. काय आहे ती बातमी ?

अभिनेता वरुण धवनचा भाऊ आणि चित्रपट निर्माता रोहित धवन आणि त्याची पत्नी जान्हवी यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. पत्नी जान्हवीसह एका बाळाच्या मुलाचे स्वागत आहे. हे जोडपे दुसऱ्यांदा पालक बनले आहे. गोव्यातील एका खासगी समारंभात फेब्रुवारी २०१८ मध्ये रोहित आणि जान्हवी यांचे लग्न झाले होते. २०१८ मध्येच जोडप्याच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला होता.

View this post on Instagram

A post shared by @varindertchawla

सोशल मीडियावर रोहित आणि त्याची पत्नी रुग्णालयातून बाहेर येतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये रोहित त्याचे वडील डेव्हिड धवन यांच्यासह दिसत आहे. या व्हिडीओत पॅपाराझी देखील आजोबा बनलेल्या डेव्हिड धवन यांचे आणि रोहितचे अभिनंदन करत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी देखील या पोस्ट वर कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान वरुण धवनची पत्नी नताशा दलाल हिने मार्च २०२२ मध्ये जान्हवीसाठी बेबी शॉवरचे आयोजन केले होते. अंशुला कपूरने देखील या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी या सेलेब्जनी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत त्यांचा आनंद शेअर केला होता. या पोस्ट वर अनेक चाहत्यांनी विविध प्रकारे कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. आता वरुण धवन केव्हा ही बातमी देतोय अशी चर्चा नेटकऱ्यानामध्ये रंगली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.