बाळ गोरे होण्याचा हट्ट बाळगून सानियाने आजमावला हा मार्ग.. पती शोएब ने केला खुलासा..

0

इंडीयन टेनिस स्टार सानिया मिर्झा नेहमीच भारतासाठी अभिमानच ठरली आहे. आपल्या अफलातून खेळीने तिने अनेक पुरस्कार प्राप्त करून भारताचा गौरव वाढवला आहे. सानियाने 2003 मध्ये टेनिसमध्ये पदार्पण केले होते. गेली १९ वर्षे ती सदोदित टेनिस खेळत आली आहे. सानिया दुहेरी खेळामध्ये क्रमांक एकची खेळाडू होती. मात्र तिच्या कंबरला दुखापत झाल्यानंतर तिने एकेरी खेळ सोडून दिले होते. एकेरीत अव्वल १०० मध्ये पोहोचणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे.

भारताचा गौरव असणाऱ्या सानियाने साल 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर, खेळाडू शोएब मलिकसोबत पारंपरिक पद्धतीने लग्न केले. 2018 मध्ये मुलाच्या जन्मानंतर सानिया मिर्झा टेनिसपासून दूर गेली होती. यानंतर तिने दोन वर्षांनंतर पदार्पण केले होते.

सानियाने आई झाल्यानंतर मैदानात परतताना तिला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले याबद्दलही सांगितले होते. आता शोएब मलिकनेही सानियाच्या प्रेग्नेंसीशी संबंधित एक निराळी माहिती शेअर केली आहे. शोएब पाकिस्तानी अभिनेत्री उषाना शाहसोबत निदा यासिरच्या शोमध्ये दिसून आला होता, जिथे त्याने आपले मुद्दे मांडले. या शो मध्ये त्याने सांगितले की सानियाचा हट्ट होता की त्यांचे बाळ हे गोरे जन्माला यावे.

शोएब म्हणाला, माझ्या सासूने सानियाला गर्भधारणेदरम्यान नेहमी सफरचंद खाण्यास सांगितले कारण तिला विश्वास होता की यामुळे बाळ गोरे होईल. यानंतर ऍकर म्हणाली, तुमचा मुलगा तर गोराच आहे. त्यावर शोएबने उत्तर दिले, हो, खुप छान, त्यामुळेच मला वाटते की माझ्या आईची ती ट्रीक कामी आली.सानियाने सफरचंद खाल्ल्यामुळेच मुलगा गोरा जन्माला आला असं शोएब म्हणाला.

शोएब मलिक आणि सानिया यांनी 12 एप्रिल 2010 रोजी हैदराबादमध्ये पारंपारिक समारंभात लग्न केले. त्यानंतर दोघांच्या लग्नाला जागतिक पातळीवरही बराच विरोध झाला आणि दोघांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले.त्यानंतर लग्नाच्या दहा वर्षांच्या कालावधीनंतर त्यांचा मुलगा इझानचा जन्म झाला. त्यानंतर अजूनही सानिया मिर्झाला सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात येते.

काही दिवसांपुर्वी भारत-पाकिस्तानचा सामना पार पडला त्यावेळीही सानिया मिर्झाला लोकांनी ट्रोल केले होते. त्यानंतर सानिया मिर्झाने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट काही दिवसांसाठी बंद केले होते. मध्यंतरी ती बऱ्याच टॉक शो आणि रिॲलिटी शोज मध्ये देखील दिसून आली होती. तिने आपल्या बाळासाठी अवलंबलेला हा नुस्खा आता सगळे वापरतील यात शंका नाही. काय होय ना ?

Leave A Reply

Your email address will not be published.