मास्टर ब्लास्टर सचिनची लाडक्या लेकीचे ते फोटोशूट झाले व्हायरल…चाहते झाले घायाळ..

0

जगभरात क्रिकेटचा देव कोण? याचे साहजिक उत्तर सचिन तेंडुलकर प्रत्येकाच्या तोंडून येत. मास्टर ब्लास्टर सचिन, गॉड, प्राइड ऑफ इंडिया अशा अनेक नावांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर चे असंख्य फॅन्स जगभरात पाहायला मिळतात. भारतातील कित्येक क्रिकेटप्रेमींचे स्वप्न असते की त्यांनी सचिन तेंडुलकर प्रमाणे खेळावं, त्याच्याप्रमाणे जगभरात नाव मिळवावं. असं असलं तरी आता सचिन तेंडुलकर प्रमाणे त्याच्या मुलांचीही चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगत असते. नुकताच सचिन तेंडुलकरच्या मुलीने अर्थात साराने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपले काही सुंदर फोटोज शेअर केले आहेत जे प्रचंड व्हायरल झाले आहेत. ज्यावर चाहते फिदा झाले आहेत.

सारा तेंडुलकरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपला नवा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ग्रीन ड्रेसमध्ये तिने एका ब्रांडसाठी फोटोशूट केलंय. साराच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तिच्या या पोस्टवर एका युजरने तिला ड्रीम गर्ल असे कॉमेंट केलं आहे. तर काही लोकांनी हार्टचे इमोजी देखील पोस्ट केल्या आहेत.

तिच्या अशा सुंदर फोटोज आणि ग्लॅमरस लूकमुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा असताना तिने आता एका ब्रँडसाठी फोटोशूट केलंय. ती नेहमी इन्स्टाग्रामवर एक्टिव्ह असते. तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.

View this post on Instagram

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

सारा तेंडुलकरचे इंस्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोवर्स आहेत. सारा तेंडुलकर आयपीएल सामन्यांदरम्यान देखील मैदानावर उपस्थित असते. इतर मुलांप्रमाणे सारालाही तयार होणं, मित्रांसोबत पार्टीला जाणं, सिनेमा पाहणं, गाणी ऐकणं यासारख्या गोष्टी आवडतात. सोशल मीडियावर सारा खूप सक्रिय होती. ती नेहमीच तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

साराचा ड्रेसिंग सेन्सदेखील खूप चांगला आहे. तिचे लूक्स अभिनेत्रींना टक्कर देणारे असतात. ,सचिनच्या लाडक्या लेकीला सतत भ्रमंती करायला आवडतं. सचिन देखील आपल्या कन्येसोबत सतत दिसून येतो. सचिन आणि साराचं मुलगी आणि बाबाचं नातं किती घट्ट आहे हे देखील फोटोंमधून दिसून येतं.

View this post on Instagram

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

अनेकदा सारा बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होता. मात्र स्वतः सचिन तेंडुलकरने ही अफवा असल्याचं सांगितलं. एकदा अशी बातमी आली होती की, सारा शाहिद कपूरसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करू शकते. तेव्हा सचिनने ट्विट करून ती अभ्यासात व्यस्त असल्याचं स्पष्ट केलं होतं.

पण सध्या तिचे हे फोटोशूट पाहता ती लवकरच बॉलीवूड मध्ये आपली जागा कायम करेल असा अंदाज नेटकरी लावत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.