KGF 2 मुळे थांबले पुष्पा सिनेमाचे शूटिंग ? काय आहे खरे कारण जाणून घ्या..
दाक्षिणात्य सिनेमांनी गेल्या काही काळात जगभरात अगदी धुमाकूळ घातला आहे. एकामागून एक ब्लॉकबस्टर सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत करत आहेत. साऊथ इंडस्ट्रीमधील बिग बजेट सिनेमांनी आपली क्रेझ कायम ठेवली आहे. पुष्पा, RRR, आणि आता KGF चॅप्टर २ अशा बॅक टू बॅक सिनेमांनी सर्वांना हादरवून सोडले आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमातील डायलॉग्जनी लहानच काय तर प्रत्येक वयोगटातील लोकांना वेडे केले आहे.
या चित्रपटाबाबतीत एक बातमी सध्या व्हायरल होते आहे. पुष्पा सिनेमाच्या दुसऱ्या भागाचे चित्रीकरण थांबवण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.. खरच असं आहे का? यामागच कारण काय? या प्रश्नामुळे चाहते काळजीत पडले आहेत.
‘पुष्पा’ सिनेमाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी सिनेमाचा दुसरा भाग येण्याची घोषणा केली होती. त्यामुळे चाहते खूपच उत्सुक आहेत. पुष्पा २ मध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना हेच कलाकार असणार आहेत. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर अफवा उठत आहेत की, ‘पुष्पा २’ चं शूटिंग सिनेमाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी थांबवलं आहे. आणि यामागचं कारण आहे ‘केजीएफ चॅप्टर २’.
‘केजीएफ २’ सिनेमाला मिळालेल्या यशानंतर ‘पुष्पा २’ सिनेमाची स्क्रिप्ट बदलली गेली आहे. असे म्हटले जात पण या बातम्यांवर आता दिग्दर्शक-निर्मात्यांनी आपली प्रतिक्रिया दर्शवली आहे.
पुष्पाचे निर्माते वाई रविशंकर यांनी या सगळ्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटल आहे. त्यांनी म्हटलं आहे की,”त्यांच्याकडे पहिल्यापासूनच इतकी उत्तम स्क्रिप्ट आहे की तिच्यात बदल करण्याचा काही संबंधच नाही.” एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत रविशंकर म्हणाले,”असं काहीच नाही. ‘केजीएफ २’ ने असं काय केलं आहे की ज्यामुळे आमच्या ‘पुष्पा २’ वर त्याचा परिणाम होईल? काहीच बदल झालेला नाही, काहीच नाही. आमच्याकडे पहिल्यापासूनच उत्तम स्क्रिप्ट आहे, आम्हाला स्क्रीप्ट बदलायची काय गरज? सुकुमार यांनी जी स्क्रिप्ट लिहिली आहे ती खूपच सुंदर आहे आणि ते स्वतः खूप चांगल्या पद्धतीनं तो सिनेमा बनवण्याच्या तयारीत आहेत. दीड महिन्यांपासून आम्ही लोकेशनचा शोध घेत आहोत. आम्ही त्याच जंगलात शूट करत आहोत जिथे पहिल्या भागाचं शूटिंग झालं होतं.
‘पुष्पा २’ सिनेमा यावर्षात १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा पहिला भाग १७ डिसेंबर रोजी सिनेमागृहात भेटीस आला होता.