कौतुकास्पद! साऊथ स्टार महेश बाबुने केले दिलदार काम, वाचवला ३० चिमुकल्यांचा असा जीव…
साऊथचा सुपरस्टार महेश बाबू आपल्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्याच्या अभिनयासोबतच त्याचे फॅन्स त्याच्या सामाजिक कार्याचेही फॅन आहेत. क्यूट स्टार म्हणून तो सर्वत्र प्रसिद्ध आहे. दोन मुलांचा वडील असूनही त्याची पर्सनॅलिटी इतरांपेक्षा फार वेगळी आहे. आजही चिरतरुण असलेल्या महेश बाबूने केवळ आपल्या अभिनय, आणि गुड लूक्स नव्हे तर आपल्या परोपकारी वृत्ती मुळे ही अनेकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.
तेलुगु सुपरस्टार महेश बाबू सुपरहिट सिनेमासोबतच आपल्या दिलदारपणासाठीही ओळखला जातो. सगळ्यांनाच त्याचा दिलदारपणा माहीत आहे.तो पीडित मुलांच्या हृदयाची सर्जरी करण्यासाठी मदत करत असतो. याचेच अजून एक उदाहरण समोर आले आहे. महेश बाबूने त्याच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर कितीतरी अनाथ आणि बेवारस मुलांची मदत करतो. नुकत्याच होऊन गेलेल्या वर्ल्ड हेल्थ डे ला त्याने ३० पेक्षा जास्त मुलांचा जीव वाचवला आहे.
त्याने आध्रं हॉस्पिटल, विजयवाडा आणि महेश बाबू फांउडेशनच्या डॉक्टरांच्या मदतीने ३० मुलांच्या हृदयाची सर्जरी केली गेली. त्याची पत्नी नम्रता शिरोडकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं की, ‘वर्ल्ड हेल्थ डे च्या निमित्ताने ३० मुलांच्या हृदयाची सर्जरी केली’. नम्रताने यावेळचे काही फोटोही शेअर केले आहेत. आणि तिने यामार्फत आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिस्वा भूषण हरिचंदन यांचे हे आयोजन सुविधाजनक करण्यासाठी धन्यवाद दिले.
View this post on Instagram
महेश बाबूने २०१९ मध्ये आंध्रा हॉस्पिटल आणि हीलिंग लिटिल हार्ट्स नावाच्या एनजीओसोबत काम सुरू केलं. त्याने आतापर्यंत १००० मुलांची सर्जरी स्पॉन्सर केली आहे. गरीब मुलांच्या सर्जरीसोबतच महेश बाबू वेगवेगळी सामाजिक कामे करतो. काही दिवसांपूर्वीच महेश बाबूचं फाउंडेशन एका नव्या उपक्रमासाठी रेनबो चिल्ड्रन हार्ट इन्स्टिट्यूटसोबत जुळलं. अभिनेत्याने मुलांसाठी कार्डियाक केअरसाठी आरसीएचआयमध्ये प्योर लिटिल हार्ट फाउंडेशन लॉन्च केलं. याद्वारे जन्मताच हृदय रोग असलेल्या मुलांवर उपचार केले जातील.
त्याने २०१६ मध्ये आंध्रातील बरीपालम आणि तेलंगणातील सिद्धापुरम गावे दत्तक घेतली आहेत. या गावांचा त्याने बराच विकास घडवून आणला आहे. याा गावातील लोक त्याला देवासारखं पूजतात.महेश बाबूने २०१९ मध्ये आंध्रा हॉस्पिटल आणि हीलिंग लिटिल हार्ट्स नावाच्या एनजीओसोबत काम सुरू केलं. त्याने आतापर्यंत १००० मुलांची सर्जरी स्पॉन्सर केली आहे. गरीब मुलांच्या सर्जरीसोबतच महेश बाबू वेगवेगळी सामाजिक कामे करतो. त्याने २०१६ मध्ये आंध्रातील बरीपालम आणि तेलंगणातील सिद्धापुरम गावे दत्तक घेतली आहेत. या गावांचा त्याने बराच विकास केला. गावातील लोक त्याला देवासारखं पूजतात. त्याच्या या कार्याला अशीच गती मिळो आणि गरिबांचे आशीर्वाद मिळत राहोत हीच सदिच्छा..