Heropanti 2: तारा सुतारियाचे फोटोशूट पाहून व्हाल थक्क.. दिसतेय खूपच स्टायलिश..

0

बॉलीवुडमध्ये अलीकडे जरी साऊथ सिनेमांचे वादळ आले असले तरी आता नव्याने रिलीज होणारे सिनेमे धूमधडाक्यात आपला आगाज करण्यास तयार आहेत. सध्या बॉलीवूडचा चार्मिंग स्टार टायगर श्रॉफ दमदार हिरोपंती २ सिनेमा घेऊन येत आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत तारा सुतारिया स्क्रीन शेयर करणार आहे. नुकतेच ताराने एक फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटोज् सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. ती या फोटोंमध्ये अतिशय मनमोहक दिसत आहे.

ताराने फोटोशूटचे काही खास फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट केले. हे फोटोज काही क्षणांतच व्हायरल झाले आहेत. या फोटोत तिने ब्लॅक रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये ती अतिशय स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसते आहे.

View this post on Instagram

A post shared by TARA? (@tarasutaria)

‘स्टुडंट ऑफ द ईयर २’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या अफेअरमुळे किंवा आगामी सिनेमामुळे ती चर्चेत आली असे नसून यावेळी तिच्या फॅशन स्टाइलमुळे तिने लक्ष वेधून घेतले आहे. अनेकदा फॅशन सेन्समुळे त्यांच्यावर टीका होते. याच कारणामुळे तारा सुतारियादेखील सोशल मीडियावर कधी कधी ट्रोल होत आहे.

सुनील शेट्टीचा मुलगा अहानचा बॉलिवूडमधील पहिला सिनेमा ‘तडप’ लवकरच रिलीज होणार आहे. सिनेमाची मोठी चर्चा सुरु आहे. सिनेमाच्या टीझरमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. याच सिनेमात लीड भूमिकेत असलेल्या तारा सुतारियाच्या परफॉर्मन्सकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. अहानचा जरी हा पहिला सिनेमा असला तरी ताराचा मात्र हा तिसरा सिनेमा आहे. छोट्या पडद्यावर बालकलाकार म्हणून करिअर सुरु करणाऱ्या ताराने अल्पावधीतच कॅमेऱ्यासमोरील आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. केवळ अभिनयच नव्हे तर गायन आणि नृत्यातही ती अव्वल आहे.

View this post on Instagram

A post shared by TARA? (@tarasutaria)

तिने विविध नृत्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले आहे. ताराला भारताची ‘माइली साइरस’ म्हणतात. तिने २००७ मध्ये ‘तारे जमीन पर’ आणि २०१० मध्ये ‘गुजारिश’ सिनेमात गाणे म्हटले होते. अभिनेत्री म्हणून २०१९ मध्ये तिला पहिली संधी दिली ती करण जोहरने. करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर २ मध्ये ती पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली.

View this post on Instagram

A post shared by TARA? (@tarasutaria)

या सिनेमात ती टायगर श्रॉफबरोबर दिसली होती. त्यानंतर ती टी- सिरिजच्या मरजावां सिनेमात दिसली होती. या सिनेमात ती सिद्धार्थ मल्होत्राबरोबर चमकली होती. या सिनेमात तिने झोयाची भूमिका केली होती. सध्या ती हीरोपंती २ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.