शाळा चित्रपटातील या अभिनेत्याचे झाले लग्न.. नुकतीच केली बातमी शेयर
सर्वत्र गाजलेल्या शाळा चित्रपटाचा अभिनेता केतन पवार लग्नाच्या बेडीत अडकल्याची माहिती समोर आली आहे. या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
चित्रपट सुपरहिट झाला होता. शालेय जीवनातील मुलांच्या मनाची घालमेल पडद्यावर दाखवणाऱ्या या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली होती.. केतकी माटेगावकर, अशंमुन जोशी यांनी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या.
आपल्या अभिनयाने तरुण पिढीला हेलावून सोडणारे हे कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. चित्रपटात बरेच कलाकार असे होते ज्यांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता. शाळेतील मधुर, अविस्मरणीय असे काही क्षण या चित्रपटाने पुन्हा उजागर केले होते. जे आजही शाळेतील दिवस आठवायला भाग पाडतात.
चित्रपटात टाईमपास फेम अभिनेत्री केतकी माटेगावकर मुख्य भूमिकेत आढळली होती. याच सिनेमातून तिने सुरुवात केली होती.
तर अंशुमन जोशी हा सिनेमाचा मुख्य अभिनेता होता. मुकुंदचा खास मित्र म्हणजे सुर्याची भूमिका केतन पवार याने साकारली होती. या चित्रपटामुळेच केतन पवारला खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्याचे पात्र मनाचा ठाव घेणारे ठरले. आपल्या अतरंगी अंदाजाने त्याने प्रेक्षकांचे मन हेरले. आणि आजही त्याचे पात्र लक्षात राहण्यासारखे आहे.
नुकतच केतन पवारने लग्नगाठ बांधली आहे. त्याच्या लग्नाचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. अभिनेता केतन पवार मंगळवारी २६ एप्रिल रोजी त्याची खास मैत्रिण प्राचीसोबत लग्नबंधनात अडकला. या लग्न सोहळ्याला त्याच्या जवळच्या मित्रमंडळींनी तसेच नातेवाईकांनी हजेरी लावली होती. लग्नाचे काही खास फोटो केतनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
केतन पवारने शाळा चित्रपटाव्यतिरिक्त पोपट, कट्टी बट्टी, खोपा, रिंगण या सारख्या चित्रपटात काम केले आहे.अभिनयासोबतच केतन उत्कृष्ट तबला वादक देखील आहे. तबला वादनाचे त्याने अधिकृत प्रशिक्षण घेतले आहे. अनेक म्युजिक शो साठी तो तबलावादक म्हणून काम करताना दिसतो आहे. जिथे त्याच्या बोटांच्या तालावर सगळे हरवतात.
“बहू असोत सुंदर संपन्न..” हे गाणं काही कलाकारांनी एकत्र येऊन नव्या रुपात सादरीकरण केलं होतं त्यात केतन पवारने देखील महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. सुखन, आम्ही दुनियेचे राजे या कार्यक्रमाचे तो सादरीकरण करताना दिसतो.एक बहुरंगी कलाकार म्हणून केतन पवार प्रसिद्ध आहे. त्याला त्याच्या नव्या आयुष्यासाठी आणि लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा..!