साऊथची ब्युटी क्वीन रात्री उशिरा आढळली या अवस्थेत.. फोटो पाहून थक्क व्हाल..
सिनेमासृष्टीत आजवर अनेक भाषेत सिनेमे रिलीज झाले आणि हिट देखील झाले. पण भाषा कोणतीही असो एखाद्या अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे डाय हार्ट फॅन असतातच. भाषा कळो ना कळो पण सिनेमात आपला आवडता हिरो किंवा हिरोईन आहे म्हंटल्यावर चाहते तो सिनेमा पहायला नक्कीच जातात. भारतीय सिनेमा क्षेत्र हे काही फक्त हिंदी सिनेमांपुरतं मर्यादित नाही, हे तर आपल्याला माहितीच आहे. यातच दक्षिणात्य सिनेमातील अभिनेते आणि अभिनेत्रींचे लाखो फॅन्स जगभरात आहेत. या कलाकारांची यादी बरीच मोठी आहे आणि त्यातले एक नाव म्हणजे साई पल्लवी…
आपल्या भन्नाट डान्स आणि अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या साई पल्लवीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पूर्णपणे झाकलेली होती. ती रात्री उशिरा थिएटरमधून गर्दीतून बाहेर पडताना आपला चेहरा दुपट्ट्याने झाकला होता. लोकांच्या नजरेपासून वाचण्यासाठी तिने हे केलं, पण अभिनेत्री कॅमेऱ्यात कैद होण्यापासून वाचू शकली नाही. ती महेश बाबूचा नुकताच रिलीज झालेला ‘सरकारू वारी पाता’ पाहण्यासाठी गेली होती, असे नंतर कळाले. यामुळे ती महेश बाबुची मोठी फॅन आहे अशी चर्चा नेट कऱ्यांमध्ये रंगली आहे.
साल २००३ च्या “कस्थुरीमन” आणि २००८च्या “धाम धूम” या सिनेमात तिनं बालकलाकार म्हणून काम केलं पण तिला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. २०१४ मध्ये जेव्हा ती जॉर्जियामध्ये तिचं वैद्यकीय शिक्षण घेत होती तेव्हा ती सुट्टीमध्ये भारतात आली होती. अल्फान्से पुथारेन या दिग्दर्शकाने तिला “प्रेमम” या सिनेमासाठी विचारलं. साई पल्लवीने होकार कळवला आणि सुट्टीमध्ये ती या सिनेमाचं शूटिंग पूर्ण करून आपल्या शिक्षणासाठी जॉर्जियाला परतली. तिचा हा पहिलाच सिनेमा प्रचंड गाजला आणि तिला या सिनेमासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला या विभागातील पुरस्कार मिळाला.
Yesterday @Sai_Pallavi92 mam Watched #SarkaruVaariPaata movie at PVR RK Cineplex (Hyderabad) 😃♥#SaiPallavi pic.twitter.com/e94wnk2OpM
— Sai Pallavi™ (@SaipallaviFC) May 15, 2022
२०२० मध्ये ती “फोर्ब्स”च्या इंडियाज 30 अंडर 30 च्या लिस्टमध्ये येणारी भारतीय सिनेमा क्षेत्रातील पहिली अभिनेत्री होती. तिने नेटफ्लिक्सच्या “पावा कधाईंगल” या फिल्म सीरिजमध्येही काम केलं आहे.
साई पल्लवी शेवटचा शूट केलेला तेलुगू चित्रपट श्याम सिंग रॉय मध्ये नानीच्या सहकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात तिने केलेली भूमिका आणि पारंपारिक भरतनाट्यम नृत्य याद्वारे तिने तेलुगू प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे आणि आता ती राणा दग्गुबती आणि प्रियामणी यांच्यासोबत तिच्या आगामी ‘विराट पर्वम’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. वेणू उदुगुला दिग्दर्शित हा चित्रपट १ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.