KGF 2 मध्ये यशला हिंदी आवाज देणारा नक्की आहे तरी कोण? आहे मुंबईचा मराठमोळा डबिंग आर्टिस्ट..
सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेल्या KGF 2 या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने कमाल केली आहे. हा चित्रपट मूळ तमिळ भाषेत आहे, पण याच्या हिंदी व्हर्जनला सर्वाधिक लोकप्रियता मिळत आहे. त्यामुळे सिनेमाच्या यशात चित्रपटात पात्रांना आवाज देणाऱ्या कलाकारांचे मोठे योगदान आहे. सिनेमाचा मुख्य पात्राला कोणी आवाज दिला आहे? माहिती आहे का ? नाही ? जाणून घ्या आजच्या या लेखात…
सिनेमात यशसाठी सचिन गोळेनं आवाज दिला आहे. सचिन गेल्या १७ वर्षांपासून डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करत आहे. एका मुलाखतीदरम्यान सचिननं या सिनेमाशी संबंधित अनेक मनोरंजक किस्से सांगितले आहेत. मुलाखतीमध्ये सचिननं सांगितलं की, याआधी आलेल्या KGF 1 सिनेमासाठीही त्यानंच डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. त्याची निवड खुद्द यशनं केली होती.”
सचिननं या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘केजीएफ २ हा सिनेमा फक्त कन्नडमध्ये रिलीज व्हावा अशी यशची इच्छा होती. परंतु बाहुबली सिनेमाला हिंदीमध्ये मिळालेल्या लोकप्रियता पाहून तो केजीएफ हिंदीमध्ये डब करायला तयार झाला. परंतु यशसाठी आवाज कोण देणार हा मोठा प्रश्न होता. त्यासाठी जो आवाज हवा होता तो जास्त खर्जामधील नको होता आणि उंच पट्टीमधला ही नको होता. तसंच बोलणारी व्यक्ती ही अस्सल मुंबईकर ज्या स्टाईलनं बोलतो तसं बोलणारी हवी होती. मी याआधीही यशसाठी काही सिनेमे डब केले होते. जे त्यानं इंटरनेटवर पाहिले. त्याला माझा आवाज आवडल्यानं मलाऑडिशनसाठी बोलावलं. त्यानंतर मला त्यानं या सिनेमाच्या डबिंगसाठी फायनल केलं.’
View this post on Instagram
सचिननं पुढं सांगितलं की, ‘निर्मात्यांनी मला सांगितलं की जेव्हा तुला वेळ असेल तेव्हा येऊन डबिंग कर. मला याची कल्पना होती. त्यामुळे या डबिंगसाठी माझं सर्वोत्तम दिलं आहे. या सिनेमाचं डबिंग रोज ४ ते ५ तास करत होतो. परंतु केजीएफ हा मोठा प्रोजेक्ट होता. त्यामुळे मला यामध्ये कोणतीही चूक करायची नव्हती. कारण माझा आवाज सिनेमाच्या हिरोसाठी होता. या सिनेमाचं डबिंग मी एका आठवड्यात पूर्ण केलं.’
या सिनेमातील ‘वायलैंस वायलैंस’ हा डायलॉग प्रचंड व्हायरल आणि प्रसिद्ध झाला., ‘त्या डायलॉगसाठी त्याला २० टेक्स घ्यावे लागले होते. असं सचिनने सांगितलं.
हिंदीमधील डायलॉगचा रिव्ह्यू यशनं स्वतः आणि दिग्दर्शक प्रशांत यांनी घेतला होता. त्यानंतरच सिनेमाचं डबिंग केलं गेलं.याशिवाय त्यानं रजनीकांत यांच्या काही जुन्या सिनेमांना,संदीप किशन आणि दुलकर सलमान यांच्या सिनेमांनाही आवाज दिला आहे. सचिन केवळ डबिंग आर्टिस्ट नाही तर तो स्वतःही उत्तम अभिनेता आहे.