अभिषेकसोबत लग्न करण्यापूर्वी लग्नाच्या ६ वर्ष आधी का लावला होता ऐश्वर्याने सिंदुर..फोटो आला समोर

0

सोशल मीडियावर जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सेलिब्रिटी कित्येकदा पोस्ट करतात. ज्या काही क्षणातच व्हायरल होतात. अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. प्रसिद्ध बॉलीवूड स्त्री दिग्दर्शक, लोकप्रिय फिल्ममेकर आणि कोरिओग्राफर फराह खान सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अलीकडेच तिने अनन्या पांडेचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये ती धमाल करताना दिसत आहे.

आणि आता फराह खानने तिच्या २००१ च्या घरातील पार्टीतील एक जबरदस्त आणि न पाहिलेला जुना फोटो शेअर केला आहे.

फराह खानने शेयर केलेल्या या जुन्या फोटोमध्ये फरहान अख्तर, ऐश्वर्या राय, करण जोहर, राणी मुखर्जी आणि साजिद खान कॅमेऱ्यासाठी पोज देत आहेत. मात्र, या फोटोमध्ये ज्या गोष्टीने लोकांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे ऐश्वर्या रायच्या भांगेतील सिंदूरने.

लग्नाच्या ६ वर्षांआधी ऐश्वर्याने सिंदूर का लावलं होतं? अभिषेक सोबत लग्न होण्याआधी तिचे लग्न झाले होते का? असे प्रश्न नेटकऱ्यानी उचलून धरले आहेत. याची तुफान चर्चा सोशल मीडियावर रंगलेली दिसत आहे.

फराह खानने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताच तो लगेच व्हायरल झाला. लग्नाआधी ऐश्वर्या रायने तिच्या मागेंत कोणाच्या नावावर सिंदूर लावला होतं. याबाबत नेटिझन्सही गोंधळले. पण, फराह खानच्या कॅप्शनने सगळं काही साफ केलं.

फराह खानने इन्स्टाग्रामवर हा जुना फोटो शेअर केला आणि कॅप्शन लिहिलं, ‘#flashback friday. हाऊसवॉर्मिंग 2001. माझ्या पहिल्या हाउसवॉर्मिंग पार्टीमध्ये, ऐश्वर्या डायरेक्ट..

देवदासच्या शूट वरुन आली आहे आणि पहिल्यांदा करण जोहरच्या डिझायनर कपड्यांशिवाय कॅपचर झाला आहे. सोबत तिने सर्व स्टार्सना मेंशन करत ही पोस्ट केली. ज्यावर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्स चा वर्षाव केला आहे.

आता फराहच्या कॅप्शनवरून हे स्पष्ट झालं आहे की, हा फोटो त्यावेळचा आहे जेव्हा ऐश्वर्या तिच्या ‘देवदास’ चित्रपटाचं शूटिंग करत होती आणि ती तिच्या शूटवरून थेट फराहच्या घरी एका फर्टीला हजर राहण्यासाठी गेली होती.

ऐश्वर्या चित्रपटाच्या सेटवरून थेट फराह खानच्या घरी पोहोचली होती तेव्हा हा फोटो क्लिक झाला होता, तेव्हा सिंदूरला मागणी होती.ऐश्वर्या रायने २००७ मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केले होते. दोघांची एक मुलगीआराध्याही आहे.

फराह खान सध्या करण जोहरसोबत ‘रॉकी आणि राणीची लव्हस्टोरी’ या चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्टसोबत धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. करण जोहर अनेक वर्षांनंतर ‘रॉकी आणि राणीची प्रेमकथा’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.