बॉलीवुड मधून गायब झालेला हा अभिनेता पुन्हा आला चर्चेत… त्याचा नवा लूक पाहिलात का?

0

बॉलीवुड अभिनेते आजकाल बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत येतात. सध्या एक अभिनेता चर्चेत आला आहे. जो बराच काळ सिने जगता पासून अलिप्त होता. पण अचानक त्याच्या एक पोस्ट मुळे नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. कोण आहे हा अभिनेता? आणि काय त्याची पोस्ट ?

२००४ साली आलेल्या अभिनेता शाहरुख खान अभिनित मैं हूँ ना हा चित्रपट तुमच्या लक्षात असेलच. या चित्रपटात अजून एक अभिनेता होता ज्यामुळे हा चित्रपट खुलून आला होता. तो अभिनेता होता जायद खान. त्याने शाहरुखच्या सावत्र भावाची लक्ष्मणची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर तो फार मोजक्या चित्रपटांमध्ये दिसून आला. आणि बराच काळ तो बॉलीवुडमध्ये दिसून आला नाही. त्यामुळे हा अभिनेता आता कसा दिसतो, काय करतो असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडतात. बऱ्याच काळानंतर जायदने नुकतेच त्याचे काही लेटेस्ट फोटो अपलोड केले आहेत. जे प्रचंड व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZAYED KHAN (@itszayedkhan)

विशेष म्हणजे इतक्या वर्षात त्याने केलेलं ट्रान्सफर्मेशन थक्क करणारं आहे.. या फोटोमध्ये तो कमालीचा आकर्षक दिसत असून इतक्या वर्षात त्याने स्वत:वर प्रचंड मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे. या पोस्टमध्ये त्याने अभिनेता हृतिक रोशनचे आभार मानले आहेत. 

“या लूकसाठी कमालीची मेहनत करावी लागली आहे. पण, या काळात मी अनेक गोष्टी शिकलो. आणि, अखेर एक अभिनेता म्हमून मी माझ्या पुढील प्रवासासाठी सुरुवात केली आहे. खरं सांगायचं तर मी या सगळ्याला खूप मिस केलंय. या ट्रान्सफर्मेशन जर्नीमध्ये मला साथ देणाऱ्या अनेकांचे आभार मला मानायचे आहेत. माझी पत्नी, आई-वडील, माझ्या बहिणी फराह खान अली, सुझैन खान, सिमोन, एक भाऊ आणि मेंटर हृतिक रोशन. बारबेरियन फिटनेसने माझ्या बॉडी ट्रान्सफर्मेशन्साठी माझी खूप मदत केली.” असं जायद म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by ZAYED KHAN (@itszayedkhan)

२००३ मध्ये जायेदने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याचा निर्णय दिला. दिग्दर्शक संगीत सिवान यांच्या ‘चुरा लिया है तुमने’ या चित्रपटातून त्याचा डेब्यू झाला. जायेदची बालपणीची मैत्रिण ईशा देओल ही त्याची या चित्रपटात हिरोईन होती. यानंतर ‘शादी नंबर वन’, ‘दस’, ‘फाईट क्लब’, ‘मिशन इस्तांबुल’ अशा अनेक चित्रपटात त्याची वर्णी लागली. सलमान २००४ मध्ये तो शाहरूख खानसोबत ‘मैं हू ना’ मध्ये झळकला. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर अर्जुन रामपाल आणि अमीषा पटेल यांच्यासोबत तो ‘वादा’मध्ये दिसला. यापश्चात शब्द, दस मध्येही त्याने काम केले. या चित्रपटातील त्याच्या कामाची बरीच प्रशंसा झाली. तरिही सपोर्टिंग हिरो इतकीच ओळख जायेदला मिळाली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.